इंदापूर : महान्युज लाईव्ह
बारामती प्रमाणेच इंदापूरची ही वाटचाल तालुक्यातील 1000 कोरोना ग्रस्तांच्या संख्येकडे सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये इंदापूर देखील कोरोनाचा 1000 चा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत. दररोज आढळणाऱ्या 40 हून अधिक रुग्णांमुळे इंदापूर देखील कोरोनाचा हळूहळू हॉटस्पॉट बनू लागले आहे.
इंदापूर तालुक्यात आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील हॉटेल व्यवसायिक असलेल्या 75 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवकांचा समावेश आहे. भवानीनगर येथील 34 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 60 वर्षीय महिला, बोरी येथील चार वर्षीय मुलगी, खोरोची येथील 59 वर्षीय महिला व 29 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
भाटनिमगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हगारेवाडी येथील 32 वर्षीय महिला व 19 वर्षीय महिला, हगारेवाडी 54 फाटा येथील वीस वर्षीय पुरुष व 16 वर्षीय पुरुष, इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज कॅम्पस मधील 38 वर्षीय पुरुष, काटी येथील 55 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील सावतामाळी नगर येथील 42 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय पुरुष, राधिका नगर येथील 29 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
निमसाखर येथील 27 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 25 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कसबा इंदापूर येथील 60 वर्षीय महिला, लाकडी येथील पाटील वस्ती वरील 40 वर्षीय पुरुष, गलांडेवाडी नंबर 2 येथील 82 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 22 वर्षीय पुरुष, एक महिन्याची मुलगी, 18 वर्षाची मुलगी व 17 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
व्याहाळी येथील 41 वर्षीय पुरुष, भादलवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, म्हसोबाची वाडी येथील 42 वर्षीय पुरुष यांचाही समावेश आहे.
आज आलेल्या अहवालामध्ये डाळज नंबर 1 व अकोले या गावांमधील कोरोनाग्रस्त एकाच कुटुंबातील व जवळच्या नातेवाईकांपैकी असे मिळून अधिक आले आहेत.
यामध्ये डाळज नंबर 1 येथील 32 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, वीस वर्षीय मुलगी, सोळा वर्षीय मुलगी, नऊ वर्षाचा मुलगा व 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
अकोले येथे पाच रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले असून यामध्ये 75 वर्षीय महिला 58 वर्षीय पुरुष 54 वर्षीय महिला 45 वर्षीय महिला 24 वर्षीय युवक व 23 वर्षीय युवकाचा समावेश आहे










