इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज बारामती ने कोरोनाग्रस्तांचा सर्वोच्च आकडा पार केल्यानंतर बारामतीच्या पाठोपाठ, किंबहुना बरोबरीनेच प्रवास सुरू असलेल्या इंदापूरच्या कोरोनाचा आजचा आकडा 40 वर स्थिरावला.
आज इंदापूर तालुक्यात सरकारी तपासणीमध्ये 85 पैकी 34 जण कोरोना बाधित आढळून आले तर बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या एंटीजन तपासणीमध्ये 20 पैकी सात जण कोरोना बाधित निघाले.
बारामतीत व इंदापूर तालुक्यात आढळून आलेल्या इंदापूरच्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 50 वर्षीय हॉटेल व्यवसायिकाचा समावेश आहे. बावडा येथील 62 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील 45 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 41 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 60 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील पोस्ट कॉलनीतील 17 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.
लासुर्णे येथील 28 वर्षीय पुरुष, नरूटेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय युवक, वालचंदनगर येथील 49 वर्षीय महिला व लाखेवाडी येथील तीस वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
वरकुटे खुर्द येथे आज सर्वाधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एका कुटुंबातील सर्व सदस्यांसह 54 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 69 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, चाळीस वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कळस येथे 19 वर्षीय युवती व पंधरा वर्षीय युवक, इंदापूर येथे 41 वर्षीय पुरुष, नेताजीनगर इंदापूर येथे 45 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, श्रीराम चौक येथील 16 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, अंबिका नगर येथील 49 वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर येथील 75 वर्षीय पुरुष, खडकपुरा येथील पंधरा वर्षीय मुलगी, अकरा वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, भटरगल्ली येथील 80 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.










