दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड ( ता. दौंड) जवळ टाटा इंडिको वाहन चा पुढचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात वाहन चालक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पाटस पोलीस चौकीचे हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी याबाबत दिली. राजेंद्र शंकर जठार (वय ३९,रा हडपसर) यांचे या अपघातात निधन झाले. वाहन चालक ते होते.
जखमी ची ओळख अद्याप पटलेली नाही. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर वरून सोलापूर दिशेकडे भरधाव वेगाने जाणारी टाटा इंडिको ही गाडी ( क्रमांक एमएच १२, के एन २६३८ ) वरवंड जवळ आल्यावर पंधरा मोरी पासून काही अंतरावर गाडीचा पुढचा टायर फुटला व गाडी फिरून महामार्गालगत असलेल्या काटेरी झाडांमध्ये जाऊन पडली. गाडीतून वाहन चालक काही अंतरावर जावून पडला यात तो जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याने महामार्ग पोलीसांनी त्यांला उपचारासाठी रूग्णालयात हलवले आहे. पुढील तपास पाटस पोलीस करीत आहेत.










