इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक असून महाराष्ट्र शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास 50 लाखांचा विमा आला करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष सागर भोसले यांनी केली आहे.
भोसले यांनी सांगितले की, तरंगवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यास कामावर कार्यरत असताना कोरोनाची लागण झाली. या कालावधीत या कर्मचाऱ्याने कोरोनाशी लढा देण्याकरता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचबरोबर विना शमास्क वाहनचालकांवरील कारवाई मध्येही भाग घेतला होता. यामध्येच त्यांना कोरोना ची लागण झाली असावी, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. सरकारने त्यांना आधार दिला नाही तर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनावर विषयी अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास शासन स्तरावर जाहीर केलेले कोविड विमा कवच लागू करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.










