बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील शासकीय दवाखान्यासह विविध खासगी दवाखान्यांमध्ये मिळून काल दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील सहा कोरोना ग्रस्तांचा समावेश असून एक जण सारी संशयित रुग्ण होता. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एक, तर माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक जणाचा समावेश आहे.
बारामती तालुक्यात आजअखेर 39 जणांचा कोरोना ने बळी घेतला असून यामध्ये सर्वाधिक मृत्यू काल दिवसभरात ते आज पहाटेपर्यंत झाले आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील सहा कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. यामध्ये अमराई तील तीन जण, यामध्ये दोन महिला, एक पुरूष, श्रीराम नगर येथील एक पुरूष रूग्ण, चोपडज, भिगवण रोड येथील महिला, गोकुळवाडी येथील पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामधील एक रुग्ण कोरोना निगेटिव्ह आला होता, तो सारीचा संशयित रुग्ण उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला.
इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील पुरुष रुग्णाचा व माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका रुग्णाचा येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला.











