इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत, मात्र चाचण्या वाढल्या आहेत, त्यामुळे कोरोनाचे रुग्ण अधिक दिसत असले तरी कोरोना नियंत्रित करण्यासाठी या तपासण्या गरजेच्या होत्या. सध्या तालुक्यात कोरोनाचे चे रुग्ण वाढताना दिसत आहेत, मात्र नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
इंदापूर तालुक्यात आज सकाळी 14 जण कोरोना बाधित आढळून आले होते, त्यानंतर संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालामध्ये खाजगी व शासकीय रॅपिड अॅटीजेन चाचणीत तब्बल तीस जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यात नायब तहसीलदार असलेल्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील अधिकाऱ्यासह त्याचे कुटुंब कोरोनाग्रस्त झाले असून यामध्ये 38 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुक्यातील बोरी येथेही 50 वर्षीय महिला कोरोना बाधित झालेली आहे. भरणेवाडी येथे आज सर्वाधिक रुग्ण आढळले असून पाच जण गावांमध्ये कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामध्ये पन्नास वर्षे पुरुष, 55 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
काटी येथे 25 वर्षीय पुरुष, वैराग बार्शी येथे 29 वर्षीय पुरुष, बावडा येथील 61 वर्षीय पुरुष, वरकुटे येथील 35 वर्षीय पुरुष, रेडणी येथील 17 वर्षीय मुलगी व 36 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 40 वर्षीय पुरुष, व्याहाळी येथील 25 वर्षीय महिला, डाळज नंबर 1 येथील 40 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 2 येथील 40 वर्षीय महिला, पळसदेव येथील 65 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष व एकोणीस वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
निमगाव केतकी येथे आज आणखी एक 23 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळली असून, घोरपडवाडी येथे 26 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय पुरुष, जळगाव येथे 30 वर्षीय पुरूष, साबळे वस्ती येथील 27 वर्षीय पुरुष, तरंगवाडी येथे 34 वर्षीय पुरुष, सणसर येथे 62 वर्षीय महिला व वनगळी येथे 31 वर्षे पुरुष रुग्ण नव्याने कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यात आज 88 जणांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये तब्बल 26 जण आढळले, तर खाजगी प्रयोगशाळेमध्ये चार जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे आज दुपारनंतर तब्बल तीस जण आढळले असून सकाळी भिगवण व इतर 14 जण कोरोना बाधित आढळले होते.











