इंदापूर महान्युज लाईव्ह
आज सकाळपर्यंत इंदापूर तालुक्यात 23 जण कोरोना बाधित आढळून आले होते, इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मिळून पुन्हा नव्याने 33 जण कोरोना बाधित झालेले आहेत.
आज सकाळी पर्यंत 94 आम्हाला पैकी 89 अहवालांमध्ये 23 जण कोरोना बाधित आढळून आले होते. उर्वरित अहवालात 4 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत आलेल्या खाजगी, शासकीय अहवालात 29 कोरोनाग्रस्त आढळले आहेत..
तरंगवाडी येथे 64 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. वालचंदनगर येथील बसस्थानकाशेजारील एकोणीस वर्षाच्या युवकास कोरोनाची लागण झाली आहे.
सणसर येथील रायतेमळा रस्त्यावरील पिता पुत्रास कोरोना ची लागण झाली असून यामध्ये 67 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. सणसर येथेच इंदापूर बारामती रस्त्यावरील एका कंत्राटदार व्यवसायिक व त्याच्या 35 वर्षीय पत्नीसही कोरोनाची लागण झाली आहे.
लाखेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर शहरातील शिवाजीनगर भागातील 38 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. लामजेवाडी येथे पती-पत्नीस कोरोनाची लागण झाले असून 60 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे
तरंगे वस्ती इंदापूर येथील 42 वर्षीय पुरुष, सरडेवाडी येथील 47 वर्षीय महिला, शास्त्री चौक इंदापूर येथील 82 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 65 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
या खेरीज दुपारी आलेल्या अहवालात निमसाखर येथील 37 वर्षीय महिला 14 वर्षीय युवक, दहा वर्षीय मुलगा व 24 वर्षे पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
काळेवाडी येथे दहा जणांना कोरोनाची लागण
इंदापूर तालुक्यातील काळेवाडी येथे दोन कुटुंबासह एकूण दहा जणांना कोरोना ची लागण झाली आहे. यामध्ये 69 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगी, 55 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, वीस वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.










