दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील कोवीड सेंटर व यवत व स्वामी चिंचोली येथे आज १९ जणांना कोरोनाची लागण
शहरातील कोवीड सेंटर मध्ये ५९ पैकी १० जणांचा कोरोना अँन्टीजेन तपासणी अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
शहरातील कोवीड सेंटर मध्ये आज (ता. 28 ) 59 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 10 व्यक्तीचे अहवाल पाँझिटिव्ह आले, तर 49 व्यक्तीचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत.
या मध्ये २६ ते ४८ वयोगटातील तीन महिला व सात पुरूष यांचा समावेश आहे. नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र चार, राज्य राखीव गट क्रमांक ७ व गट क्रमांक ५ प्रत्येकी एक, पाटस, लिंगाळी प्रत्येकी एक तर दौंड शहर दोन तसेच यवत व स्वामी चिंचोली मधील अहवालात ४३ पैकी ९ जणांचा अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे.
यामध्ये पाटस सात,आलेगाव एक, बेटवाडी एक, असे ९ जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. पाटस येथील खासगी चार व शासकीय अहवाल ८ असे १२ कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. यामध्ये चार व्यापारी आहेत.










