महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख १० हजारांवर पोचली असून आतापर्यंत दैनंदिन कोरोना रुग्ण आढळून येण्याची ६० ते ७० हजारांपर्यंत पोचलेली आज थेट ७५ हजार ७६० वर पोचली आहे. थोडक्यात एका तासाला आता तीन हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळू लागले आहेत.
महाराष्ट्रातही दिवसभरात १४ हजार ७१८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून राज्यातील १ लाख ७८ हजार २३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.










