इंदापूर : महान्यूज लाईव्ह
घरात कोरोना ची बाधा झाली.. पाच जण कोरोना बाधित निघाले, तरीदेखील कुटुंबातील सर्वांना धीर देण्यासाठी तो धाकटा भाऊ चालत चालत निघाला.. काळजी नको, माघारी येऊ असे सांगून गाडीत बसला.. तो माघारी आलाच नाही आणि तो आला नाही, आज थोरला देखील परतला नाही.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील ही दुर्दैवी घटना आज इंदापूर तालुक्यातील अनेकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. इंदापूर शहरात बाजारपेठेत किराणा दुकान चालवणारे एकाच कुटुंबातील पाच जण तीन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आले होते. त्या कुटुंबातील दोन भावांचा संसार होता. यामध्ये 48 वर्षीय भाऊ व पन्नास वर्षीय दुसरा थोरला भाऊ दोघेही कोरोनाबाधित आले. दोघांसह घरातील इतरही कोरोना बाधित आढळले. त्यांना तपासणी व उपचाराच्या निमित्ताने घेऊन जाणाऱ्या गाडीत बसताना अत्यंत व्यवस्थितपणे व सर्वांना धीर देत धाकटा भाऊ बसला आणि त्यांनी कोणालाही काही होणार नाही काळजी करू नका असे सांगितले होते.
आरोग्य खात्यातील या दोन भावांना ओळखणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसा हा सुखद अनुभव होता, मात्र या आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला. येतो असे सांगून रुग्णवाहिकेत बसलेला धाकटा भाऊ माघारी परतलाच नाही, उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. धाकट्या भावाचा काल मृत्यू झाला आणि थोरल्या भावासही ही त्रास होऊ लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज थोरल्या भावाचे देखील निधन झाले. यापैकी एका भावाच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी तर, एका भावाच्या पाठीमागे एक मुलगा अशी अपत्ये आहेत.
एकाच दिवसाच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू होणे व संपूर्ण कुटुंब एका क्षणात दुःखाच्या खाईत कोसळणे ही घटना आज अनेकांना विचलित करून गेली करुणा ने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात २७ जणांचा बळी घेतला आहे, यामधील या दोन भावांचा मृत्यू एक संपूर्ण कुटुंबाचे दैनंदिन ज््जीवन उद्ध्वस्त करून गेले.










