इंदापूर : महान्यूज लाइव्ह
इंदापूर तालुक्यात काल काही गावांमधील संपूर्ण कुटुंबे कोरोना बाधित आढळून आली होती तोच पायंडा आज देखील कायम राहीला. आज देखील जवळपास चार गावातील कुटुंबे किंवा एकमेकांच्या संपर्कातील नातेवाईक एकापेक्षा अधिक असलेले आढळून आले आहेत. याचा अर्थ असा की, नागरिकांनी प्रचंड काळजी घेण्याची गरज असून जे बाहेर फिरत आहेत, त्यांनी स्वतःहून कुटुंबापासून स्वतःला विलग करण्याची काळाची गरज आहे.
आज ज्या गावांमध्ये कोरोना बाधित आढळून आले, त्यामध्ये भवानीनगर येथील 16 वर्षीय युवकाचा समावेश आहे. बावडा येथे दोन रुग्ण आढळले असून त्यामध्ये 26 वर्षीय युवक व पंचवीस वर्षीय युवकाचा समावेश आहे. इंदापूर शहरात देखील दोन रुग्ण आढळले असून 26 वर्षीय युवक व 32 वर्षीय युवकाचा कोरोनाची लागण झाली आहे.
कळंब येथे एका कुटुंबातील 60 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कळाशी येथे देखील तीन जण कोरोना बाधित आढळले असून त्यामध्ये 38 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक रुग्णाचा समावेश आहे.
बोरी येथे पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित आढळले असून यामध्ये 14 वर्षीय युवक, तीस वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगी, 79 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे. निमसाखर येथेही आज 5 जण आढळले असून यामध्ये 19 वर्षीय युवती, 70 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. शिरसटवाडी येथे ते 34 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय पुरुष रुग्ण आढळला असून शेळगाव येथे 32 वर्षीय महिला, पळसदेव येथे 65 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथे 42 वर्षीय पुरुष, वरकुटे येथे 39 वर्षीय पुरुष व माळवाडी येथे 25 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
कारागृहात शिरलेल्या कोरोनाने प्रशासन चिंतेत
काल इंदापूर तालुक्यातील कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज कारागृहातील सर्वच कैद्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर कारागृहात असलेल्या 17 रुग्णांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरूष, 32 वर्षीय पुरुष, तीस वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरुष, वीस वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 22 वर्षीय युवक, 21 वर्षीय युवक, 23 वर्षीय युवक, 36 वर्षीय पुरुष, वीस वर्षीय युवक व 27 वर्षीय पुरुष कैद्यांचा समावेश आहे.










