दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्याच्या भागातील कोरोनाने आज अर्धशतक केले. आज तब्बल ५३ जण कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत.
यवत येथील कोवीड सेंटरचा कोरोना तपासणी अहवाल आला असून यामध्ये १७ जणांचा अहवाल हा पाँझिटिव्ह आला आहे ही माहिती यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली.
यवत येथील कोवीड सेंटर मध्ये सोमवारी (ता. २४ ) कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ११० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ६५ जणांचे अहवाल आज सायंकाळी आले, यामध्ये ६ ते ६७ वयोगटातील ८ पुरुष व ९ महिला असे १७ जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला. तर ४६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आढळलेल्या रूग्णांमध्ये पाटस येथे एक, केडगाव येथे चार, डाळिंब चार, चंदनवाडी चार, कडेठाण येथे दोन, वाळकी एक असे एकूण १७ जण कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.
दरम्यान सकाळी दौंड येथील कोवीड सेंटर मधील प्राप्त झालेल्या अहवालात ३६ व यवत येथील कोवीड सेंटर मधील सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १७ असे तब्बल ५३ जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.










