महान्यूज लाईव्ह : करिअर रिपोर्ट
बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या करियरचा पाया रचतो. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यामध्ये नेहमीच्या वाटा सोडून वेगळे अभ्यासक्रम निवडण्याचा कल पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, क्रिएटीव्हीटीला, आणि जिज्ञासेला वाव देणारा अभ्यासक्रम म्हणजे मास कम्युनिकेशन.
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्यासोबत सतत असलेली गोष्ट म्हणजे मीडिया…गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या तंत्रज्ञानामुळे आपल्यासाठी अपरिचित वाटणारे हे क्षेत्र करियरसाठी खुले झाले आहे. मीडियामध्ये करियर करण्यासाठी मास कम्युनिकेशची पदवी गरजेची आहे. मात्र हा अभ्यासक्रम फार थोड्या शैक्षणिक संस्थामध्ये चालवला जातो.
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये 2014-15 मध्ये बी.व्होक -जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन हा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. बारावी कोणत्याही शाखेतून पास झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत माध्यमांचे शिक्षण देणारा बी.व्होक जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन हा एकमेव पदवी अभ्यासक्रम टीसी कॉलेजने सुरु केला आहे.
जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशनची पदवी पुर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रॉनिक मिडिया– देशातल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सुरुवात आकाशवाणी आणि दुरदर्शनपासून झाली. मात्र आजच्या घडीला देशात 900हून अधिक टेलिव्हीजन चॅनल्स सुरु आहेत आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे खासगी रेडिओ स्टेशन्सची संख्या वाढत आहे.
डिजीटल मीडिया– इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे मनोरंजनाच्या व्याख्याच बदलून गेल्या आहेत. जगातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या पाच कंपन्या याच क्षेत्राशी निगडीत आहेत. सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळ्या वेबसाईट्सना खुप मोठ्याप्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झालीय.
प्रिंट मीडिया– भारतात जवळपास 80 हजार वर्तमानपत्र, मासिके, साप्ताहिक प्रकाशित होतात. या माध्यमाची उलाढालही प्रचंड मोठी आहे. रिपोर्टर, फोटोग्राफर, आर्टिस्ट, संपादकीय विभागामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
चित्रपट निर्मिती– मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पुर्ण करण्या-या विद्यार्थ्यांना चित्रपट, लघुपट, माहितीपट निर्मितीचे ज्ञान दिले जाते. त्यामध्ये स्क्रीप्ट रायटिंग, सिनेमोटोग्राफी, व्हीडिओ एडिटींग, प्री-प्रोडक्शन, पोस्टप्रोडक्शन, त्याचबरोबर अभिनयाचे प्राथमिक धडे दिले जातात. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात, जनसंपर्क, माध्यम संशोधन, वेब कम्युनिकेशन या क्षेत्रांत करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सुरु झालेला बी.व्होक जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रमाला युजीसी, नवी दिल्लीकडून मान्यता देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कौशल्य विकास आधिरित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यासाठी असलेला सुसज्ज टेलिव्हीजन स्टुडीओ, एडिटींग लॅब, स्क्रिनिंग लॅब, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपही असते. स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी हा पुरक अभ्यासक्रम आहे.
बी.व्होक जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी http://www.tccollege.org या वेबसाईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 8422991555, 9764402892, 9309144641 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा.











