महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्रात एकीकडे बिहारने सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण लावून धरले असतानाच आता शिवसेना चौहान यांच्या मृत्यूच्या चौकशीत उतरली आहे.
उत्तर प्रदेशचे मंत्री व माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांना लखनौमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट व मेडीकल सायन्स या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेथे त्यांच्या किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. स्वतः चौहान हे देखील डॉक्टरांच्या वर्तुणुकीवर नाराज होते. त्यांना त्यानंतर मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक बिघडत गेली. त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या मृत्यूनंतर शिवसेनेने राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला असताना राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.










