इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर आज दिवसभरही कायम सुरू राहिला. बड्या नेत्यांसह वेगवेगळ्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. दिवसभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 24 वर गेली आणि आज इंदापूर ने कोरोना ग्रस्तांचा 500 चा आकडा ओलांडला.
आज इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर शहरातील रामदास गल्ली येथील 75 वर्षीय पुरुष, पवार वाडी येथील 25 वर्षीय महिला, माळवाडी नंबर 2 येथील तीन वर्षीय मुलगा, बोरी येथील 43 वर्षीय पुरुष, घोलपवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, नेताजी नगर येथील 42 वर्षीय महिला, लासुर्णे येथील 33 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 53 वर्षीय पुरुष, शहाजीनगर येथील तीस वर्षीय पुरुष, भवानीनगर येथील चार वर्षीय मुलगा, कुरवली येथील 32 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तत्पूर्वी आज सकाळी आलेल्या अहवालात इंदापूर तालुक्यातील नऊ जण कोरोना बाधित आढळले होते. यामध्ये बड्या नेत्यांचा समावेश होता.
आज इंदापूर तालुक्यातील कोरोना ग्रस्तांनी 500 चा आकडा ओलांडला. आज ही संख्या 505 वर पोचली. आजच्या कोरोनाच्या एका मृत्यूने बळींची संख्या 25वर पोचली.











