बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती मध्ये आज दिवसभरात तब्बल 21 जण कोरणा बाधित आढळले असून बारामतीमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या 541 झाली आहे.
बारामतीत काल कोरोना संशयितांचे 115 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 102 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. शासकीय तपासणीत बारामती शहरातील 11 व ग्रामीण भागातील दोन असे 13 रुग्ण कोरोना बाधित आढळले.
आज दिवसभरात बारामती मध्ये एकूण 24 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी बारामती शहरातील 5 व ग्रामीण भागातील 3 असे आठ रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आज दिवसभरातील कोरोना ग्रस्तांची संख्या 21 झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटस रोड येथील 2, शंकर भोई गल्ली येथील चार, खंडोबा नगर येथील 2, कसबा येथील एक, सिद्धार्थ नगर येथील एक,फलटण रोड येथील एक व ग्रामीण भागातील काटेवाडी येथील एक व वडगाव निंबाळकर येथील एक असे 13 जण तसेच एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट येथील 2, विवेकानंद नगर येथील एक, सूर्यनगरी येथील एक व अमराई येथील एक व वडगाव निंबाळकर येथील एक, वानेवाडी येथील एक आणि गुणवडी येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे










