इंदापूर : महान्यूज लाइव्ह
इंदापूर तालुक्यात आज पुन्हा नव्याने 18 जण कोरोना बाधित निघाले असून, इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोना ग्रस्तांच्या संख्येचा विचार करत गेली पंधरा दिवसापासून मागणी होत असलेल्या हॉस्पिटल अधिग्रहणाचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आज इंदापूर तालुक्यात शासकीय तपासणीमध्ये आठ जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी उपसभापती यांचाही समावेश आहे. आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर शहरातील कसबा येथील दोन वर्षीय मुलगा, इंदापूर शहरातील तीस वर्षीय पुरुष, इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील 35 वर्षे पुरुष, भिगवण येथील 56 वर्षीय महिला व 24 वर्षीय महिला, भाटनिमगाव येथील पाच वर्षीय मुलगी, शेळगाव येथील अकरा वर्षीय मुलगी व वालचंदनगर येथील सात वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
आज बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या इंदापूर तालुक्यातील 10 जणांना कोरोना ची लागण झाली आहे. यामध्ये बेलवाडी येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील 27 वर्षीय महिला, 32 वर्षे पुरुष यांच्यासह भिगवण येथील एकाच कुटुंबातील 35 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगा व पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. भिगवण येथीलच आणखी एका कोरोनाग्रस्त च्या संपर्कातील 53 वर्षीय पुरुष 47 वर्षीय महिला व पंचवीस वर्षीय महिलेला देखील कोरोना ची लागण झाली आहे. तर इंदापूर शहरातील राजवली नगर येथील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे खाजगी तपासणीत आढळून आले आहे.
इंदापूर तालुक्यातील सात खाजगी हॉस्पिटल अधिग्रहित; 6 ऑगस्ट चा आदेश इंदापूर प्रशासनाला मात्र मिळाला 23 ऑगस्ट रोजी..!!
काल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी इंदापूरचा दौरा केल्यानंतर इंदापूर नगरपालिका तसेच महसूल प्रशासनाच्या वस्तीतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोरोना रूग्णांच्या सुविधा संदर्भात जरा सिरीयस घ्या आता समजुतीचा सल्ला दिला. त्यानंतर प्रशासनाची चक्रे काहीशी वेगाने हलली व गेल्या काही दिवसांपासून मागणी होत असलेली हॉस्पिटल अधिग्रहणाची प्रक्रिया मार्गी लागली. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भिगवण मेडिकेयर हॉस्पिटल व यशोधरा ट्रामा केअर अॅड आय सी यु या दोन खाजगी हॉस्पिटल्ससह इंदापूर शहरातील यशोदीप हॉस्पिटल लाईफ केअर आयसीयू, श्रेयस नर्सिंग होम, निळकंठ हॉस्पिटल अँड आय सी यु व राऊत हॉस्पिटल या हॉस्पिटल ची सेवा अधिग्रहित करून तेथील डॉक्टरांची देखील सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहेत.
हा आदेश प्रांताधिकार्यांनी 6 ऑगस्ट रोजी काढला असून इंदापूर तालुक्याला मात्र तो 23 ऑगस्ट रोजी मिळाल्याचा दावा आरोग्य खात्याच्या सूत्रांनी केला आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत असताना एखाद्या आदेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा व्हावा लागतो हेदेखील दुर्दैव म्हणावे लागेल.










