इंदापूर : महान्युज लाईव्ह
बारामती तालुक्याने कोरोनाचा 400 चा आकडा पार केल्यानंतर आता इंदापूर देखील त्याच मार्गाने प्रवास करीत असून आज इंदापूर ने कोरोना बाधितांचा 362 चा आकडा गाठला आहे. आज व काल मिळून इंदापूर तालुक्यात तब्बल 25 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यात दोन दिवसात तब्बल पंचवीस जण कोरोना बाधित आढळले असून नव्याने उद्धट, रेडणी, वालचंदनगर, अगोती नंबर 2, न्हावी, वडापुरी या गावांमध्ये नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
या दोन दिवसात आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये निरगुडे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असून यामध्ये 70 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे.
कळंब येथेदेखील पाच जण आढळले असून यामध्ये 54 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, 22 वर्षीय युवक, 26 वर्षीय युवक व 37 वर्षे पुरूष रूग्ण समाविष्ट आहे.
रेडणी येथे 35 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरात आंबेडकरनगर येथे 21 वर्षीय युवक, इंदापूर शहरातील सिद्धेश्वर नगर येथे 52 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील सातबोळ येथे पंचवीस वर्षीय मुलगी व सहा वर्षीय मुलगी व वेंकटेश नगर येथे ते 65 वर्षीय महिला कोरुना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील उद्धट येथे तीस वर्षीय महिला, भिगवण स्टेशन येथे पन्नास वर्षे पूरूष, वालचंद नगर येथे 50 वर्षीय महिला, अगोती नंबर 2 येथे 25 वर्षीय मुलगा व दोन वर्षीय मुलगा, न्हावी येथे 50 वर्षीय महिला आढळून आले आहेत. वडापुरी येथे 65 वर्षीय पुरुष व निमगाव केतकी ते 35 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात नव्याने सात रुग्ण कोरोना
बारामतीतील कालचे प्रतीक्षेतील उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून काल एकूण 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बारामती शहरातील चार, त्यामध्ये भोई गल्ली येथील एक, सूर्यनगरी येथील एक, महिला हॉस्पिटल शेजारील एक व पाटस रोड येथील एक असे शहरातील चार व पंधरे येथील एक, ढाकाळे येथील एक, म्हसोबावाडी- मानाप्पावाडी येथील एक असे तालुक्यातील तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व इंदापूर तालुक्यातील एक रुग्ण आढळून आलेला आहे. बारामतीतील रुग्णसंख्या 418 झालेली आहे.










