दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील एका प्रसिध्द व्यवसायिकांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा खासगी रूग्णालयातील प्रयोग शाळेचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे, अशी माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकरी डॉ. शिवराणी पांचाळ यांनी दिली.
पाटस येथील एका प्रसिध्द व्यवसायिकांच्या कुटुंबातील एका महिलेस मागील तीन चार दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर संबंधित कुटूंबांतील दहा जणांनी पुणे येथील खासगी रूग्णालयात कोरोना विषाणुची तपासणी केली.त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये कुटूंबातील सहा व्यक्तींचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. तीन महिला व तीन पुरूष यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सहा जण कोरोना बाधीत झाल्याने पाटस मध्ये खळबळ उडाली आहे. यात संबंधित व्यवसायिकांचे नामंकित दुध डेअरी व मुख्य चौकात कापड दुकान आहे. यामुळे या कुटंबातील व्यक्तींच्या संपर्कात नेमके किती जण आले आहेत याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.
सध्या पाटसमध्ये बारा जण अॅक्टीव कोरोना बाधीत रूग्ण आहे. यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर व खासगी रूग्णालायत संबंधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा खासगी रुग्णालाचा अहवाल आहे.संबंधित व्यापारी कुटूंबातील कोरोना बाधीत व्यक्तींनी शासकीय प्रयोग शाळेत कोरोना विषाणुची तपासणी करण्यास नकार दिला आहे.त्यामुळे शासकीय प्रयोग शाळेत तपासणी करण्यात अडचण येत आहे.त्यामुळे संबंधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना विषाणुची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती डॅा.शिवराणी पांचाळ व आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली.










