बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील 65 नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले होते. त्यामध्ये बारामती शहरातील 5 व ग्रामीण भागातील चार असे एकूण बारामती तालुक्यातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. बारामती तालुक्यात सकाळी दोन अहवालांमध्ये मिळून 21 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरांमधील फलटण रोड येथील तीन जण तसेच अशोकनगर येथील एक जण, देसाई इस्टेटमधील एक रुग्ण तसेच मेडद येथील तीन जण व खताळपट्टा ढेकळवाडी येथील एक जणांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील 31 वर्षे पुरुष रुग्णासही कोरोना ची लागण झाली आहे











