बारामती : महान्यूज लाईव्ह
काल प्रमाणेच आजदेखील बारामतीत कोरोना चा प्रसार कायम राहिला आज आता सकाळ पर्यंत आलेल्या अहवालानुसार 12 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत प्रशासनाने वारंवार लॉक डाउन करणार नसल्याचे जाहीर केले आहे, परंतु नागरिक मात्र वाढत्या कोरोनाच्या संख्येबाबत कोणताही धडा घेताना दिसत नाहीत. प्रत्येकाला काम आहे अशा अविर्भावात सारेजण रस्त्याने गर्दी करत आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतही मोठी गर्दी झालेली दिसत आहे. त्याच्या जोडीला कोरोना रुग्णांची संख्या मात्र तशाच प्रकारे दररोज वाढते आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने बारामतीकरांनी बारामती पॅटर्नचा आदर्श जिल्ह्यातील इतर तालुक्यांपुढे मांडला, तो पुन्हा एकदा नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राबविण्याची गरज आहे. अत्यंत आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची तसदी जर नागरिकांनी घेतली तर सध्याचा कोरोनाचा सामुहिक प्रसार रोखला जाऊ शकतो. सध्या मात्र लक्षात कोण घेतो? असाच प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
काल बारामती मध्ये 93 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये 70 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये खंडोबा नगर येथील 80 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 19 वर्षीय मुलगा, म्हाडा कॉलनी येथील 28 वर्षीय पुरुष, ख्रिश्चन कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, खांडज येथील 48 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 27 वर्षीय महिला व सात वर्षीय मुलगा, झारगडवाडी येथील पंचवीस वर्षीय महिला, पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चौघेजण जण कोरोना बाधित झाले असून यामध्ये 25 वर्षीय युवक, 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष व तेवीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. मळद येथेही तीस वर्षीय पुरुषात कोरोनाची लागण झाली आहे










