दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला मागील दोन दिवसात दिलासा मिळाला. मागील तीन दिवसात तालुक्यात फक्त चार रूग्ण सापडले आहेत. दुसरीकडे नमुने निगेटिव्हचे प्रमाण वाढले आहे.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पाटसला मागील दोन दिवसात तीन कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. हे तिन्ही रूग्ण व्यावसायिकाच्या कुटुंबातील असून दोन महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे अशी माहिती पाटस प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली.
११ आॅगस्ट रोजी तालुक्यात खडकी येथे एक रूग्ण आढळला. १२ आॅगस्ट रोजी पिंपळगाव येथील दोन व्यक्तींचा कोरोना तपासणी खासगी अहवाल पाँझिटिव्ह आला, मात्र मागील दोन दिवसात तालुक्यात १५६ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला. शहरात देखील १६० जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते.
दरम्यान सध्यातरी कोरोना चा प्रादुर्भाव दौंड मध्ये कमी होत असल्याचे चित्र आहे, मात्र तरीही नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तोंडाला मास्क वापरावे, लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधी असा कार्यक्रमात मोजकेच लोकांच्या उपस्थित पार पाडावेत असे आवाहन आरोग्य विभाग व प्रशासनाने केले आहे.











