उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : महान्यूज लाईव्ह
“हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं..” सारख्या शेरो-शायरीच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांचं निधन ही भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राहत इंदौरी साहेबांच्या निधनाने सामाजिक विषयांवर मार्मिक भाष्य करणारा, भावना, वेदना, संवेदनांना जिवंत करणारा, शब्दांचा जादूगार हरपला आहे.










