महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
महाराष्ट्र आणि मराठा द्वेषी कर्नाटक सरकार महाराष्ट्राने जागेवर आणलं.. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात एका रात्रीत हटवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा जिल्हा प्रशासन पुन्हा पूर्ववत जाग्यावर बसणार आहे, त्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली असून जर आठ दिवसांत पुतळा जाग्यावरती बसवला नाही, तर मनगुत्ती ग्रामस्थ तो पुतळा बसतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या घटनेवरून महाराष्ट्रात वातावरण चांगलेच पेटले आहे.
कन्नडीगांनी अचानकच हटवलेल्या पुतळ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी वेगवेगळी आंदोलने करत कर्नाटक मधील भाजप सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. आज महाराष्ट्रात संतप्त वातावरण निर्माण होताच कर्नाटक सरकार भानावर आले. या घटनेचे आज संपुर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले त्यानंतर भानावर आलेल्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने हा पुतळा मनगुत्ती येथे आठ दिवसात आम्ही कायदेशीर पूर्तता करून बसवू असे आश्वासन दिले आहे. येत्या आठ दिवसात ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीतून कायदेशीर पूर्तता करून हा पुतळा बसवला जाईल असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे, परंतु ग्रामस्थ मात्र आठ दिवसात जर पुतळा बसवला नाही तर तो आम्ही स्वतः बसवू या मागणीवर ठाम आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून 8 दिवसांत पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या 8 दिवसांत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठक होणार असून पुतळा बसवण्याची तारीख ठरवण्यात येणार आहे. मात्र, बेळगाव प्रशासनानं 8 दिवसांत शिवरायांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी गावकरी पुतळा बसवतील, अशी मनगुत्ती येथील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे










