बारामती : महान्यूज लाईव्ह
आज सकाळी बारामतीतील तपासणीमधील 96 नमुन्यांपैकी 13 जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर दुपारपर्यंत उर्वरित 13 नमुन्यांमध्ये बारामती तालुक्यातील 4 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, तर इंदापूर तालुक्यात सकाळपर्यंत 7 जण आढळून आले होते, आता पुन्हा 3 जणांची भर त्यामध्ये पडली आहे.
बारामती तालुक्यात रुई कोविड सेंटर वरती 96 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये इंदापूर, दौंड व बारामती या तिने तालुक्यातील रुग्णांचा समावेश होता यामध्ये आज सकाळी जाहीर झालेल्या अहवालात मध्ये बारामती तालुक्यातील कालच्या एका रुग्णासह 13 जण आढळून आले होते तर दुपारच्या प्रलंबित अहवालामध्ये बारामती तालुक्यातील आणखी चार जणांना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे बारामती तालुक्यातील एका दिवसाची कोरोना ग्रस्तांची संख्या 18 वर पोचली आहे. बारामती तालुक्यातील आढळलेल्या रुग्णांमध्ये डोर्लेवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, राम गल्ली बारामती तील 34 वर्षीय पुरुष, सुहासनगर येथील 42 वर्षीय महिला व आमराई तील 24 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 10 वर
दरम्यान बारामती येथे तपासणी झालेल्या व संबंधित 96 नमुन्यांपैकीच असलेल्या इंदापूर तालुक्यातील तिघांना ही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मानकरवाडी येथील 37 वर्षीय महिला, काझड येथील 53 वर्षीय पुरुष व भिगवण येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.










