इंदापूर महान्युज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आणि आज कोरोना ने ७ वा बळी घेतला. सणसर येथील कोरोनाग्रस्त माध्यमिक शिक्षकाचा उपचारादरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला.
27 जुलै पासून हे शिक्षक कोरोना वरील उपचारासाठी बारामतीत दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत चढउतार येत असला तरी प्रकृती स्थिर होती, मात्र अचानक सकाळी प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. हे कोरोनाग्रस्त शिक्षक हरहुन्नरी चतुरस्त्र होते. परिसरामध्ये कलाशिक्षक, सूत्रसंचालक तसेच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असल्याने सुपरिचित होते.
सणसर विकास मंचाच्या माध्यमातून शाळांच्या सुशोभीकरण व डिजिटलायझेशन च्या प्रक्रियेत त्यांनी खूप मोठा हातभार लावला होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त झाली. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांनी नुकतीच कोरोना वर मात केली होती.










