वाटा रोजगाराच्या – समीर मुलाणी
बारामती : महान्यूज लाईव्ह
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी )मध्ये अकाउंटंट असिस्टंट या पदांची चार हजार 182 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
संपूर्ण देशात ही भरती होणार असून यासाठी येत्या 17 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. यामध्ये हे अकाउंट असिस्टंट- एच आर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, फीटर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, सर्वेअर, वेल्डर, संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, लॅबोरेटरी असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट या पदांचा समावेश आहे.
त्याची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे. या सर्व जागांकरिता खुल्या गटातील उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय 24 वर्ष असावे. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयात सवलत असेल. बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अकॅडमी चे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज समांतर आरक्षण तसेच इतर सर्व सविस्तर माहितीसाठी ओएनजीसीच्या http://www.ongcindia.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.











Looking for job completed 12th standard
Give me a call on 8655557724