बारामती : महान्युज लाईव्ह
बारामती मध्ये पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा सिलसिला आता दररोज चालू आहे आज देखील पुन्हा नव्याने सहा जण कोरोना बाधित आढळले आहेत तर मृतांची संख्या ही दररोज आढळतेच आहे, आज कोरोनाने बारामती तालुक्यातील 15 वा बळी घेतला.
काल बारामती मध्ये एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 83 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 13 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालापैकी एकूण सहा नमुने बारामती शहरातील चार व कांबळेश्वर येथील एक युवक व पारवडी येथील एक पुरुष असे ग्रामीण भागातील दोन असे एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 77 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 154 झालेली आहे बारामती शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये रुई येथील दोन जणांचा व तांबे नगर येथील एक जण व जाधव वस्ती फलटण रोड बारामती येथील एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. रात्री माळेगाव येथील पूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला पुणे येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झालेला आहे. बारामतीतील मृतांची संख्या पंधरा झाली आहे तसेच उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 73 आहे ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.










