इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज इंदापूर तालुक्यात सकाळी आलेल्या अहवालात १० जण कोरोना बाधित आढळले होते, संध्याकाळी आलेल्या अहवालात नव्याने ११ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त इंदापुरातील बड्या व्यावसायिकांसह दोघा जणांना नाशिक मध्ये कोरोनाची बाधा झाली आहे, ते तिथेच उपचार घेत आहेत.
आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये इंदापूर तालुक्यात १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. दुपारनंतर आलेल्या अहवालामध्ये पुन्हा ११ जणांना कोरोनाची बाधा आढळून आली आहे.
यामध्ये कुरवली येथील नव्याने कोरोना बाधित आढळून आले आहेत. कुरवली येथे एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली होती, त्यांच्या संपर्कातील इतरांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यामध्ये एकास कोरोनाची बाधा आढळून आली आहे, सुरवड येथील दोन नवे कोरोनाची बाधा झाली आहे. तरंग वाडी येथे एक, तर तालुक्यातील राऊतवस्ती येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
इंदापूर शहरातील एका बड्या व्यापार्यासह दोघांना नाशिक मध्ये काल कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर संपर्कातील निकटच्या नातेवाईकांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला. शहरातील ४ जणांना कोरोनाची बाधा आढळून आली आहे.










