नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना ची बाधा झाली असून त्यांनी स्वतः या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
गृहमंत्री शहा यांनी चार ओळींचे ट्विट करून आपल्याला कोरोनाची बाधा झालेली असून इतर कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळताच त्यांनी तातडीने वेळ न घालवता कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही केले आहे.
गृहमंत्री शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये आपली तब्येत व्यवस्थित असून डॉक्टरांनी मात्र सल्ला दिल्याने मी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी होम आयसोलेट करून घ्यावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.










