इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरमध्ये काल ३९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ही माहिती दिली.
इंदापूरमध्ये काल ३९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून १० जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये भिगवणमध्ये चार, म्हसोबावाडीत दोन, कळाशी येथील एक, निमगाव केतकी येथील एक आणि इंदापूर येथील दोन अशा एकूण दहाजणांचा समावेश आहे. इंदापूरमध्ये दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यान चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.










