बारामती : महान्यूज लाईव्ह
काल बारामतीत मारवाड पेठ येथील महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी तालुक्यातील कांबळेश्वर येथील ज्येष्ठ कोरोनाग्रस्ताचा पुण्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाने हा घेतलेला तालुक्यातील 14 वा बळी आहे.
काल बारामती मध्ये एकूण 34 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून काल संध्याकाळी बारामती हॉस्पिटल मध्ये मारवाड पेठेतील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तिचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला असून तो पॉझिटिव आलेला आहे. उर्वरित 9 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.बारामती तालुक्यातील सांगवी कांबळेश्वर परिसरातील एक जेष्ठ कोरोनाग्रस्त पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचार घेत होते त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे बारामती तालुक्यातील मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 14 वर पोचली आहे. बारामती तालुक्यातील हा वाढता मृत्युदर चिंतेची बाब आहे.
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या आता 132 झालेली आहे व त्यापैकी उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 आहे. 48 रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये व 3 जण घरी उपचार घेत आहेत असे एकूण 51 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे.











