सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्ग्याचे संस्थापक ट्रस्टी व माजी ग्रामपंचायत सदस्य नशिर शेख यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक इंदापूर येथे पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व पुणे जिल्हा कॉंग्रेसचे सहप्रभारी दादू सेठ खान हे उपस्थित होते. या वेळी लुमेवाडीचे नशिर अब्दुल गणी शेख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत प्रभारी दादू सेठ खान व तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केले.
नशिर शेख हे लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्ग्याचे संस्थापक ट्रस्टी आहेत. ते गेल्या 25 वर्ष पासून ट्रस्टी म्हणून काम करत आहेत. ते लुमेवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्यही आहेत. लुमेवाडी, सराटी, पिंपरी, टणु भागत त्यांचा जनसंपर्क आहे.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिरभाई काजी, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, राहुल वीर, संतोष आरडे, खजिनदार भगवान पासगे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील, निखिल निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, अनिकेत चंदनशिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











