दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामीण भागात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज नऊ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.
यवत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली. काल गुरूवारी ( ता.30 ) कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील 50 व्यक्तींची यवत येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोनाची तपासणी करण्यात आली. या 50 पैकी 9 ही जण पॅाझिटिव्ह तर 41 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
राहु येथे चार, भांडगाव येथे दोन आणि कानगाव, वरवंड, केडगाव येथे प्रत्येकी एक असे एकुण नऊ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान काल दौंडच्या ग्रामीण भागात 20 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. यामुळे कोरोनाने दिलासा दिल्याचे चित्र होते, मात्र आज तालुक्याच्या ग्रामीण भागात नऊ व्यक्तींना कोरोना झाला आहे. तर शहरातील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे. .










