दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील विविध भागात आज १८ ते ७५ वयोगटातील नऊ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर तर्फे काल बुधवारी (दि. २९) एकुण 30 व्यक्तींचा घसातील स्त्रवाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे, यामध्ये 30 पैकी 9 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आले तर 21 व्यक्ती चे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये तीन महिला व ६ पुरुष यांचा समावेश आहे. शहरातील पाटील चौक, बंगला साईड, नेहरू चौक, शालीमार चौक, गजानन सोसायटी, जनता कॉलनी, जगदाळे वस्ती, गोपाळवाडी, भवानी नगर या भागात प्रत्येकी एक असे नऊ नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. दरम्यान, दौंड च्या ग्रामीण भागात आज दिलासा मिळाला असताना शहरातील कोरोना बाधीत रूग्णांचे तांडव मात्र सुरूच आहे.











