दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तहसील कार्यालयातील लिपीक अजित दत्तात्रय ढमे ( वय 27, रा.वेताळनगर दौंड ) यांचे आज गुरूवारी (ता..30) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
अजित ढमे हे दौंड तहसील कार्यालयातील मागील पाच ते सहा वर्षापासून लिपीक पदावर काम करीत होते. त्यांच्या शांत मनमिळाऊ व नागरीकांना तत्काळ कामाला विनाविलंब कोणतेही काम मार्गी लावत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दौंड शहरासह व तालुक्यात सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक अधिकारी गमावल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. अजित ढमे यांच्या मागे पत्नी, अडीच महिन्याचा मुलगा व आई असा परिवार आहे.










