दौंड : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या दौंड शहरासह ग्रामीण भागाला आज दिलासा मिळाला आहे. एरवी मोठ्या संख्येने रुग्ण सापडत होते. आज मात्र शहरात एक, तर तालुक्यात चार असे एकूण पाच कोरोना बाधीत रूग्ण निष्पन्न झाले आहेत.
दौंड शहरातील ५१ व्यक्तींची मंगळवारी कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील ५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज दौंड शहरातील पाटील चौकातील ४६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहर आणि तालुक्यात पाचशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असतानाच आज मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह अहवाल आल्याने दौंडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.










