दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील विविध भागात आज ११ जण कोरोनाबाधित आढळून आले होते, आता तालुक्यातील ग्रामीण भागात नव्याने पाच जण कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत सर्व मिळून १६ जण कोरोनाबाधित झाले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. काल (ता. २४ ) यवत येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोनाबाधीतांच्या संपर्कातील ५७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये तालुक्यातील पश्चिम भागात पाच कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बोरीपार्धी, खुटबाव, ताम्हाणवाडी, उंडवडी, जावजी बुवाचीवाडी या गावात प्रत्येकी एक अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन महिला व तीन पुरुष यांचा समावेश आहे.











