दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरात १४ कोरोना बाधीत रूग्ण आज सापडले असतानाच आज दौंड च्या ग्रामीण भागात १९ जणांचा कोरोनाचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. काल कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील १०० जणांची कोरोना विषाणू ची यवत येथील कोवीड सेंटर येथे तपासणी करण्यात आली. यामध्ये १९ व्यक्तींचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. तर उर्वरीत ८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर चा अहवाल प्रलंबित आहे.
आज शहरातील विविध भागात १४ कोरोना बाधीत नवे रूग्ण सापडले आहेत. तर आज दौंड च्या ग्रामीण भागातील केडगाव येथील पत्रा कंपनीच्या ६ कामगारांना कोरोना ची लागण झाली आहे, तर कासुर्डी येथे ५, जावुजी बुवाचीवाडी येथे ४ तर सहजपुर, नानगाव, वरवंड, मिरवडी येथे प्रत्येकी एक असे १९ जण नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत.
दरम्यान, आज दिवसभरात शहरात १५ व तालुक्यातील ग्रामीण भागात १९ असे ३३ नवे रूग्ण सापडले आहेत. गुरूवारी दौंड च्या ग्रामीण भागात भांडगाव येथे दोन, खुटबाव व बोरीपार्धी येथे प्रत्येकी एक असे चार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसात तालुक्यात ३७ रूग्ण सापडले आहेत. तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे अाव्हान प्रशासनासमोर आहे.











