वाटा रोजगाराच्या
बारामती : महान्यूज लाईव्ह
ठाणे महानगरपालिकेत कोविडच्या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू केलेल्या विविध रुग्णालयांमध्ये इंटेन्सिविस्ट, भूलतज्ज्ञ, फिजीशियन, मेडीकल ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर ऑफिसर, नर्सेस, आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची भरती होणार आहे, या नियुक्त्या कोरोनाचे संकट संपेपर्यंत असतील, मात्र त्यासाठीचे मानधन आकर्षक आहे.
यामध्ये १३८० परिचारिका असून ४८० वैद्यकीय अधिकारी, फिजीशीयन.आयुर्वेद व अतिदक्षता अधिकाऱ्यांच्या ४८० जागा असून २९९५ जागांची ही भरती होणार आहे. येत्या २८ जुलै पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक व सविस्तर माहितीसाठी http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. कमाल वयोमर्यादा ३८ वर्षापर्यंत आहे. २६ हजार रूपयांपासून २ लाख ४० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन या पदांकरीता मिळणार आहे. बारामतीतील राष्ट्रवादी करिअर अकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार याची निवड पध्दत ही लेखी परीक्षा,मुलाखतीद्वारे होणार आहे.










