वाटा रोजगाराच्या
बारामती : महान्यूज लाईव्ह
जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कल मध्ये बीपीएम (ब्रॅंच पोस्टमास्तर), जीडीएस (डाक सेवक) व एबीपीएम (असिस्टंट ब्रॅंच पोस्टमास्तर) पदाच्या ४४२ जागांची भरती सुरू आहे. याकरीता अर्ज करण्याची शेवटची मुदत ५ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे.
याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून यामध्ये उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १० वी व तत्सम परीक्षा उत्तीर्ण अशी आहे. याकरीता उमेदवाराची वयोमर्यादा खुल्या गटासाठी किमान १८ वर्षे व कमाल ४० वर्षे आहे. मेरिट क्रमांकानुसार याची निवड पध्दती होणार आहे. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क १०० रुपये असून महिला, अनुसूचित जाती, जमाती, अपंग, परित्यक्ता यांच्यासाठी अर्ज शुल्क नाही. अधिक व सविस्तर माहितीसाठी www.appost.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.











Indian Army