इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज इंदापूरमध्ये नव्याने तीन जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये पळसदेव मध्ये एका व कळंब येथे दोन रुग्णांची नव्याने नोंद झाली. ंदापूरचा कोरोना आता शंभरीकडे वाटचाल करू लागला आहे. आतापर्यंत इंदापूरमध्ये ९५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. इंदापूरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यात नव्याने ८८ जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.
इंदापूरमध्ये आज नव्याने आलेल्या अहवालानुसार तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कळंब येथे यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, मात्र पळसदेव येथे नव्याने रुग्ण सापडल्याने तेथील चिंता वाढली आहे. हळूहळू इंदापूर तालुक्याची कोरोनाच्या बाबतीत शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. बारामतीत आज नव्याने पाच रुग्ण सापडले असतानाच शेजारच्या इंदापूर तालुक्यातही ३ रुग्ण आढळल्याने दौंड, पुरंदरप्रमाणेच दररोज इंदापूर- बारामतीतही कोरोनाचे रुग्ण दिसू लागले आहेत, त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.











