इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या उत्तर व मध्य भागानंतर कोरोना पुन्हा एकदा दक्षिणेकडे शिरला असून गणेशवाडी नंतर आता बावड्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
आरोग्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बावड्यातील ही महिला अकलूज येथे उपचारासाठी दाखल झाली होती. या महिलेला कोरोना सदृश्य़ लक्षणे दिसल्याने तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात वाढत चाललेले कोरोनाचे रुग्ण ही चिंतेची बाब आहे.











Chhan