बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीत तालुक्यातील पवईमाळ येथील कोरोनाग्रस्त महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला,
पवईमाळ येथील ५५ वर्षीय महिलेस त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी हा त्रास अधिकच वाढल्याने खासगी दवाखान्यातून तिला रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आज या महिलेला श्वसनाचा त्रास वाढल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बारामतीतील हा पाचवा बळी ठरला आहे.
दरम्यान काल बारामती शहर व तालुक्यातील ३८ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. अर्थात निगेटिव्ह आलेल्यांनी देखील १४ दिवस नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावे व त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











