
बारामती : महान्यूज लाईव्ह
काल रात्री नव्याने सूर्यनगरी येथील एका 32 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली त्यामुळे ११५ जणांच्या तपासणीत चार जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.काल दिवसभरामध्ये 115 पैकी 18 जण वगळता इतर सर्वांचा अहवाल आला होता त्यामध्ये तिघाजणांना कोणाची लागण झाली होती उर्वरित अहवाल रात्री उशिरा आले त्यामध्ये येथील सूर्यनगरीतील 32 वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे दिसून आली. अर्थात बारामतीत तब्बल एकशे अकरा जणांना कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.










