• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अय्योव…मला कोरोना झालाया…

Maha News Live by Maha News Live
July 14, 2020
in ताज्या बातम्या
0

माहितगार..

आम्हास्नी फिरस्तीची लय हौस…कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झालं आणि आम्हाला मोकळंढाकळं गाव कसं दिसतं, ते बघायची लहर आली..मग काय, आम्ही फटफटी काढली आणि चक्कर मारायला गेलो… आख्खा चौक भिकारदास बनला होता.. चिटपाखरू नव्हतं… असं कधीच झालं नव्हतं.. या कोरोनानं माणूस माणसात ठेवला नायी याची फार म्हणजे फार खंत वाटली… आपसूक डोळ्यात पाणी आलं..तेवढ्यात एक पोलिसदादा जवळ आला.. म्हणाला, काय बघतोयास?… रडतोस का?… मी भरल्या डोळ्यांनी त्यांस्नी उगीचंच हो, असं म्हणालो… मी उगीच म्हणालो खरं, पण आतून भरून आलं होतं..पोलिसदादाला मात्र मी नवटाक टाकून आल्यासारखं वाटलं.. आणि असा उगीच रडू नको बाबा… रडायचंच, तर त्याला कायतरी कारण पाह्यजी… म्हणत त्यानं आमच्या पाठीमागे दोन जोरात पाईप टाकले.. ह्यो रट्टा एवढा जोरात व्हता की, आम्ही धनुष्यबाणासारखंच ताणलो गेलो… पुन्हा दोन जोरात फटके बसले.. आणि खरोखरच रडायला लागल्यावर पोलिसदादानं, आंग अश्शी, असं रडायचं बाबा, असं सांगत, डोळं लाल करून, चल निघ इथून! असा इशारा दिला.. आणि आयशपथ सांगतो, चार रातीला आमची पाठ बिछान्याला टेकलीच नाही.. आमची फिरस्तीची हौसच फिटली.. तवापासून घरात जे लॉकडाऊन करून घेतलं..ते आजपतोर…!

………


आज मात्र मनाचा बराच निग्रह केला..बाहेर फिरायचंच म्हणालो..गावात आलो, तर वस्तीवरनं राम्या आलेला.. शहराकडं दवाखान्यात निघालेला..विचारलं तर त्याच्या पुण्याच्या भावाला शहरातल्या दवाखान्यात अॅडमिट केल्याची खबर दिली. भावासह भावजय अन दोन पोरं बी दवाखान्यात अॅडमिट केल्याती असं म्हणत त्यानं पैशाचा हिशोब सांगितला. प्रत्येकाचं तीन दिसाचं ५०-५० हजार बिल झालेलं.. चौघाचे दोन लाख भरायचे होते आज.., शिवाय अजून किती दिस ठिवणार माहित नव्हतं..मका, गहू विकून झाला, दोन गायी पण काढल्या बाजारात आणि भावजयीचं गळ्यातलं बी मोडलेलं.. त्यानं मला हे सांगितल्यावर कसंसच वाटलं…पण खरं सांगू का, माणूस कितीबी श्रीमंत असू दे नाहीतर गरीब, दवाखान्यापुढं माणूस पालापाचोळाच असतोया… म्हणून तर गावाकडं कुणी म्हणेचना … अय्योव, मला कोरोना झालाया…!!


……….


आज मी टिव्हीवर गंमत बघितली… तो करोडपतीचा सिलेब्रिटी ‘अय्योव मला कोरोना झालाया...' म्हणत टिव्हीवर आला होता… माझंच छाताड लय भरून आलं.. म्हणलं च्यामायला, लोकं म्हणतेत, कोरोना नको, ‘अन ह्यो बाबा, एखादं प्रवचन सांगितल्यासारखं आरामात सांगतोय की, मला कोरोना झालाया…’ तसंबी या लोकांकडं पैसा असतोच म्हणा.. त्यामुळं कोरोना झाला म्हणून पैशाकडं हे लोक बघणारच नाहीत… पण पुन्हा कळलं, यांच्याही घरात चार जणांना कोरोना झालाय..अरे बापरे, वस्तीवरच्या राम्याच्या भावासारखंच हे पण प्रकरण आहे असं वाटल्यानं ते काय सागंताहेत याच्याकडं डोळे लावून बसलो..

ते सांगत होते, या कलावती दवाखान्यातला स्टाफ एकदम देवासारखाच आहे, त्यांनी अत्यंत खूप चांगली सेवा दिलेली आहे, मी एकदम फाईन आहे असे सांगत असताना मी एकदम कल्पनाविश्वातच गेलो… डोळ्यासमोर स्वर्ग होता.. सारे देव माझ्याभोवती गोळा झालेत… कोणी मला हसतमुखाने सलाईन लावतेय, कोणी माझा ईसीजी काढतेय.. सगळीकडे तो नाटकात कसा धूर काढतात, तसाच सगळा धूर… पण डोळ्यात चुरचुरत नव्हतं… कोणीतरी हळूच सांगितलं की, तो ऑक्सिजन आहे, तुझ्यासाठी खास जास्तीचा लावलाय… आणि जेव्हा मी या साऱ्याचं पैसे किती? असं विचारलं, तेव्हा हसत हसत त्यांनी माझ्या दहा एकराची किंमत सांगितली आणि मी खाडकन त्यातून भानावर आलो…

सेलिब्रिटी अजून पण सांगतच होते. टिव्हीवरची बाई देखील एकदम भावुक झाली होती.. माझा पुतण्या तेवढ्यात घरी आला.. मी त्याला सेलिब्रिटीच्या कोरोनाची कहाणी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितली….तेव्हा तो म्हणाला, काका, त्यानं बनारस मधून मुंबई गाठली आणि शेकडो कोटी गोळा केले, असेच तुमच्यासारख्या भाबड्या लोकांच्या जीवावर… आता तरी सुधरा… ज्याच्या बंगल्यात गेल्या पाच वर्षापासून चार-चार लाख रुपये महिना पगाराचे दोन डॉक्टर कायम आहेत, बंगल्यातल्या १९ खोल्यांमध्ये चार आयसीयू आहेत.. त्याला पैशाची काहीच कमी नाही, त्यानं घरात उपचार घेण्यापेक्षा हा दवाखाना का गाठला?… पुतण्याच्या या अनपेक्षित बॉम्बने थोडं जाग्यावर आलो… मागं सरकून तोंडाचा चंबू करीत विचारलं..का? तर पुतण्या म्हणाला, काका..अवं ही सगळी नाटकं… त्या दवाखान्याच्या मालकीत या बाबाची भागिदारी आहे म्हणत्यात… त्या दवाखान्यानं मागच्या दहा पंधरा दिवसांत लाखोंनी बिलं करून कोरोनाच्या पेशंटांची लूट केली… मुंबईतल्या लोकांनी तोंडात शेण घालायला सुरवात करताच त्या दवाखान्याची अब्रू वाचवायला हे बापलेक त्या दवाखान्यात गेलेत… कसले डोंबलाचे देव घेऊन बसला, मातीचे पाय आहेत, साऱ्यांचे…! स्वार्थी कुठले.. पुतण्यानं हे सांगताच मी टिव्ही बंद केला.. त्यानंतर पुतण्या म्हणाला, काका, तुम्हाला माहिती झालं का?… वस्तीवरचे तुमचे मित्र रामकाका, त्यांचे भाऊ, दवाखान्यात होते ना? त्यांना बिलापायी जमीन विकल्याचं कळल्यामुळं त्यांना हार्ट अॅटॅक आला…कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांचा मृतदेह इकडे येणार नाहीये, शहरातल्या कोणत्याशा स्मशानभूमीत परस्पर अंत्यसंस्कार होणार आहेत…!!

Tags: Baramati Indapur Corona ConnectionCorona FightMahanews.LIVE
Next Post
बारामतीतील २३ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; एकाचा अहवाल बाकी

बारामतीतील २३ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; एकाचा अहवाल बाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group