महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
चीनने गलवान खोऱ्यात केलेल्या देशविघातक कृत्यानंतर भारताने ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली. आता चीनी वस्तूंवर बहिष्काराची हाक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी देताहेत, अशा वेळी मोबाईल खरेदी करताना चायनीज नको असेल, तर जगातील इतर देशांतील मोबाईल चांगले पर्याय ठरू शकतात व ते १० ते १५ हजारापर्यंत मिळू शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी एम 21 हा मोबाईल ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेऱ्याचा असून त्याची किंमतही १५ हजारांमध्येच आहे. त्याची स्टोअरेज क्षमता देखील चार जीबी रॅम व ६४ जीबी रॉमची आहे. याखेरीज सॅमसंग गॅलेक्सी एम ३० हा १० हजार ३७७ रुपयांच्या आसपास आहे, नोकीया ६.१ प्लस हा ८ हजार ९९९ रुपयांना आहे, तर सॅमसंग गॅलेक्सी एम २० हा ११ हजार २७९ रुपयांना मिळू शकतो. याखेरीज असूस झेनफोन मॅक्स प्रो एम१ हा मोबाईल ७ हजार ९९९ रुपयांना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा आपल्या नजिकच्या मोबाईल दुकानांमध्ये मिळू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम १० हा मोबाईल ९ हजार २९९ रुपयांना मिळू शकेल. असूस झेनफोन मॅक्स एम २ हा मोबाईल ७ हजार ४९९ रुपयांना मिळू शकेल. नोकीया ५.१ प्लस हा मोबाईल १२ हजार १२९ रुपयांना मिळू शकतो.
याखेरीज सॅमसंग गॅलेक्सी एम 21 हा १४ हजार ९९९ रुपयांना मिळू शकेल. याला देखील ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 11 हा १२ हजार ९९९ रुपयांना मिळू शकतो. यामध्ये १३, ५ व २ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे. नोकिया 7.1 फोनची किंमत १३ हजारांच्या आसपास आहे. यामध्येही फोटोग्राफीसाठी 12 व 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. याच्या किमती कमी अधिक असू शकतात. भौगोलिक स्थितीनुसार यामध्ये बदलही होऊ शकतात, मात्र चीनी नको असलेल्यांसाठी हे मोबाईलही उत्तम पर्याय ठरू शकतात.











