नागपूर : महान्यूज लाईव्ह
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथे ही घटना घडली आहे. येथील तथागत विद्यालयातील मुख्याध्यापिका शांतशीला भोजराज मेश्राम आणि तिचा पती व संस्थेचा सचिव भामर आज दौलतराव मेश्राम या दोघांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली.
करमाड येथील तथागत विद्यालयात शांत शीला मेश्राम मुख्याध्यापिका असून शाळेतील एका शिक्षकाला अतिरिक्त होण्याची भीती दाखवत साडेसहा लाख रुपयांची मागणी या पती-पत्नी केली होती तडजोडी अंती 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले या गुन्ह्याची नोंद खापरखेडा पोलिस ठाण्यात झाली आहे.
या शाळेतील शिक्षक हाच तक्रारदार असून या शिक्षकाला हे पती-पत्नी हजेरीपटावर स्वाक्षरी करू देत नव्हते. सहाजिकच हा शिक्षक गैरहजर राहिल्याचे वारंवार दिसत असल्याने त्याला अतिरिक्त करण्याची धमकी देत साडेसहा लाख रुपयांची मागणी मुख्याध्यापिका आणि संस्थेचा सचिवाने केली. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने या शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या संदर्भातील पडताळणी केल्यानंतर या पती-पत्नीने पैसे मागितल्याचे उघड झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, हवालदार सुनील कळंबे, सारंग बालपांडे, सुशील यादव, बबिता कोकडे, गीता चौधरी, करुणा सहारे, अमोल भक्ते यांच्या पथकाने सापळा रचला व 50 हजार रुपयांची लाच घेताना शांतशीला मेश्राम व भामराज मेश्राम या दोघांना ताब्यात घेतले.











