दिल्ली : महान्यूज लाईव्ह
३७० कलमामुळे बाहेरील लोकांना जम्मु काश्मीरमध्ये जमिन खरेदी करता येत नाही. त्यामुळे येथील विकास होत नाही, असे कारण केंद्र सरकारने ३७० कलम रद्द करताना दिले होते. आता केंद्र सरकारने आज संसदेत दिलेल्या माहितीनूसार आजपर्यंत या राज्यात केवळ ७ बाहेरच्या लोकांनी प्लॉट खरेदी केले आहेत. या ७ जणांनी जम्मु विभागात प्लॉट खरेदी केली आहे. एकाही व्यक्तीने आतापर्यंत काश्मीर विभागात प्लॉट खरेदी केलेली नाही.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली.
३७० कलम रद्द करताना आता येथे बाहेरील लोक जमिन खरेदी करतील, येथे अनेक उद्योग येतील व विकास होईल अशी आशा दाखविण्यात आलेली होती. परंतू आतापर्यंततरी यातील सरकारचा हा दावा खरा ठरताना दिसत नाही.











