मुंबई : महान्यूज लाईव्ह
अजून नव्याने सापडलेल्या कोरोनाच्या प्रकाराला ” ओमीक्रॉन ” म्हणावे की ” ओमीएक्रॉन ” हे ठरत नाहीये, तोवर ऑस्ट्रेलियातून नवी बातमी आली आहे. त्यांना दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये असा कोरोनाचा विषाणू सापडला आहे, तो ओमीक्रॉनशी पुर्णपणे जुळत नाही.
हा ओमीक्रॉनचाच आणखी बदललेला अवतार आहे, ज्याचे काहीच डीएनए ओमीक्रॉन कोराना विषाणूशी जुळतात, पण ते पुर्णपणे जुळत नाहीत. यामुळे या कोरोना विषाणूला ” ओमीक्रॉनसारखा ” असे तेथील शास्त्रज्ञांनी म्हणले आहे.
हा विषाणू सध्या प्रचलित असलेल्या कोरोनाच्या तपासण्यातून ओळखणे जास्त अवघड असल्याचेही त्यांनी म्हणले आहे.
परंतू यामुळे पुन्हा सगळा देश खुला करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नांना थोडा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.